अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडून प्रशंसा
By Admin | Updated: July 30, 2015 23:34 IST2015-07-30T23:34:43+5:302015-07-30T23:34:43+5:30
केंद्र शासनाच्या जलस्वराज्य टप्पा २, स्वच्छ भारत अभियान व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या पाहणीसाठी अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठाचे शिष्टमंडळ जिल्ह्यात दाखल झाले होते.

अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडून प्रशंसा
अलिबाग : केंद्र शासनाच्या जलस्वराज्य टप्पा २, स्वच्छ भारत अभियान व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या पाहणीसाठी अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठाचे शिष्टमंडळ जिल्ह्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जागतिक बँकेचे महाराष्ट्राचे समन्वयक जी.व्ही.आर. मूर्ती यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेस भेट देवून, जिल्ह्यातील काविर (अलिबाग), मसद बुद्रुक, नारंगी, कुंभवली (खालापूर) या ग्रामपंचायतींंच्या योजनांचा अभ्यास केला.
रायगड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष मोळावणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता पी.एम. साळुंके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड हे उपस्थित होते. जिल्ह्यांतील तीनही कार्यक्रमांच्या प्रगतीबाबत या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.
अलिबाग तालुक्यातील कावीर ग्रामपंचायतीस भेट देऊ न गावातील स्वच्छता स्थिती व पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, जलस्रोतांची माहिती या बाबत प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधून माहिती घेतली.
शिष्टमंडळाने कावीर हायस्कूलला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी स्वच्छता व पाणी गुणवत्ताविषयी प्रश्नोत्तरांतून संवाद साधला. ग्रामसेविका ज्युली घासे यांनी गावात राबविण्यात येणाऱ्या जलस्वराज्य योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. रायगड जिल्ह्यात यशस्वी पागोळी विहिरीबाबत त्यांनी विशेष रुची दाखविली.
शिष्टमंडळासमवेत असलेले उपअभियंता आर.एस.माळी, उपअभियंता बी.आर. खैरे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एल.साळावकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील समाजशास्त्रज्ञ रविकिरण गायकवाड, मूल्यमापन व सनियंत्रण सल्लागार सुनील माळी व दत्तात्रेय नाईक, मनुष्यबळ विकास सल्लागार आनंद धिवर, जलस्वराज्यांचे समाजव्यवस्थापन तज्ज्ञ वसंत राठोड, अभियांत्रिकी तज्ज्ञ तुषार राठोड, कक्ष अधिकारी सुरेश पुजारी, लेखाधिकारी विवेक कोरडे, संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील व नेहा जाधव, पाणी गुणवत्ता निरीक्षक नंदकुमार गायकर, पाणी गुणवत्ता सल्लागार अदिती मगर, लेखाधिकारी जान्हवी घोसाळकर आदि कक्षातील तज्ज्ञ व सल्लागार उपस्थित होते. जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)