शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

अवकाळीची झळ सर्वसामान्यांच्या घरापर्यंत; भाजीपाल्याचे भाव कडाडले

By निखिल म्हात्रे | Updated: December 6, 2023 14:51 IST

रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे

अलिबाग - आठवडाभरापासून राज्यातील विविध भागांत पडलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे. या पावसाचा कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून भाजीपाल्यासह फळांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी रायगड जिल्ह्यात होणाऱ्या फळ आणि भाजीपाल्याच्या आवकवरही परिणाम होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. भाज्यांची अवाक घटल्याने भाजी मंडईमध्ये फळ आणि पालेभाजीचा भाव वधारला आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला भाजीपाला पाण्यात भिजून गेला आहे. तर हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांकडून तयार असलेला माल बाजारात आणण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे सध्या बाजारात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.पण पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने भविष्यात भाजीपाल्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती फळांच्या बाबतीतही आहे. फळांच्या बागा ही पाण्याखाली गेल्या आहेत. अलिबाग, पेण, माणगाव आणि कर्जत तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील बाजारात भाजीपाला येत असतो. मात्र अवकाळी पाऊस मोठया प्रमाणात झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.कोकणातील हापूस आंब्याला मोहोर येत आहे. तर, काही झाडांना मोहोर पकडला होता. मात्र, अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंब्याला आलेला मोहोर गळून पडला आहे. त्याचा परिणाम फेब्रुवारी, मार्चमध्ये येणाऱ्या आंब्यावर होणार आहे. पाऊस नसताना शेतकऱ्याने मेहनत करून पाणी आणून बागा जगवल्या आहेत; मात्र आता बागा तयार झालेल्या असताना अवकाळी पावसाने हजेरी लावून मेहनतीवर पाणी सोडले. यामुळे मुंबईला येणाऱ्या भाजीपाला तसेच फळांच्या किमतींवर येत्या काळात परिणाम पाहायला मिळेल.- निलेश उतेकर, फळ बागायतदार.

टॅग्स :Raigadरायगडvegetableभाज्या