शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘देशात सध्या मनुस्मृतीचेच अघोषित राज्य’ - आनंदराज आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:05 IST

समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले.

महाड : समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. मात्र आजही आपल्या देशात अघोषित मनुस्मृतीचेच राज्य असल्याची टीका करीत या राज्यकर्त्यांचे मनसुबे वेळीच धुळीस मिळवा, अन्यथा देशात पुन्हा गुलामगिरीचे राज्य येईल अशा शब्दांत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी राज्यकर्त्यांवर आसूड ओढले.महाडमध्ये मनुस्मृती दहनाच्या ९१ व्या वर्धापन दिनी महाडच्या क्रांतीभूमीवर बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत आनंदराज आंबेडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याचे राज्यकर्ते घटनाविरोधी आहेत, त्यांनी जगात सर्वश्रेष्ठ समजली जाणारी आपली राज्यघटना बदलण्याची भाषा करू नये, असा इशाराही आंबेडकर यांनी यावेळी दिला.यावेळी संघराज रूपवते, विनोद मोरे, एच. आर. पवार, सी. डी. जाधव, अंकुश सकपाळ, गजानन तांबे यांचीही भाषणे झाली. डॉ. प्रमिला संपत, अलका शिंदे, सपना रामटेके यांंचीही भाषणे झाली. यावेळी क्रांतीस्तंभासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.यानिमित्ताने चवदार तळे, क्रांतीभूमी व राष्ट्रीय स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांसह राज्यातील विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी अभिवादनकेले.

टॅग्स :Raigadरायगड