इमारतीचा स्लॅब कोसळल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; पनवेलमधील दुर्दैवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 08:08 IST2022-12-12T08:08:17+5:302022-12-12T08:08:50+5:30
सुकापुर ग्रामपंचायत हद्दीमध्ये पन्नास हुन अधिक धोकादायक इमारती झाल्या आहेत. यातील बहुतांशी इमारती जीर्ण झाल्या असून त्यात नागरिक वास्तव्य करत आहेत.

इमारतीचा स्लॅब कोसळल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; पनवेलमधील दुर्दैवी घटना
मयुर तांबडे
नवीन पनवेल - सुकापुर येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. शुभम राजभर असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.
सुकापुर ग्रामपंचायत हद्दीमध्ये पन्नास हुन अधिक धोकादायक इमारती झाल्या आहेत. यातील बहुतांशी इमारती जीर्ण झाल्या असून त्यात नागरिक वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायतीने इमारती खाली करण्यासाठी नोटिसा देखील बजावले आहेत. असे असताना देखील नागरिक जीवावर उदार होऊन त्यात राहत आहेत. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या नवजीवन सोसायटीच्या दुसऱ्या व पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. यात तळमजल्यावर राहत असलेला शुभम सुरेश राजभर याचा मृत्यू झाला. यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता.