खदाणीत बुडून १९ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2023 15:48 IST2023-07-10T15:48:00+5:302023-07-10T15:48:33+5:30
या प्रकरणी न्हावा-शेवा बंदर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

खदाणीत बुडून १९ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू
उरण : रविवारी बेलपाडा येथील आक्सा दगडखाण परिसरातील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या जासई येथील सिद्देश घरत १९ वर्षीय तरुणाचा बुडून दूदैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी न्हावा-शेवा बंदर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
जासई येथील काही तरुण गावा शेजारीच असलेल्या बेलपाडा परिसरातील आक्सा दगड खाणीच्या खदाणीत पोहण्यासाठी गेले होते. यातील सिद्देश घरत(१९) हा तरुण तलावा बाहेर बराच वेळ न आल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. यासाठी न्हावा-शेवा पोलीस तसेच सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह आढळून आला.
या खदाणीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज येत नसल्याने झेप घेतल्यानंतर दगडाचा मार लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.