पोलादपूरमध्ये बेशिस्त पार्किंग

By Admin | Updated: March 15, 2016 00:52 IST2016-03-15T00:52:44+5:302016-03-15T00:52:44+5:30

शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग, पोलादपूर बाजारपेठेतील मार्ग, शिवाजी चौक परिसर यासह प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पार्किंगची

Unconditional parking in Poladpur | पोलादपूरमध्ये बेशिस्त पार्किंग

पोलादपूरमध्ये बेशिस्त पार्किंग

पोलादपूर: शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग, पोलादपूर बाजारपेठेतील मार्ग, शिवाजी चौक परिसर यासह प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पार्किंगची समस्या आहे. शहरात बेशिस्त पार्किंगमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय येथे पार्किंगची मोठी समस्या आहे. तहसील कार्यालय आवारात प्रशस्त पार्किंग असल्यावरही मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावर, पोलादपूर-महाबळेश्वर मार्गालगत प्रत्येक व्यापारी गाळ्यासमोर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहतात. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर शहरांचीही आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात वाहनतळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने बेशिस्त वाहने उभी करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र याकडे कोणाचेही लक्ष्य नसल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे.

Web Title: Unconditional parking in Poladpur