माणगावमध्ये विनापरवाना दारू जप्त

By Admin | Updated: May 6, 2017 06:16 IST2017-05-06T06:16:17+5:302017-05-06T06:16:17+5:30

माणगाव रेल्वे स्टेशन येथे विनापरवाना विदेशी दारू बाळगली असता दोघांना माणगाव बीट मार्शल पोलीस पथकांनी पकडून

Unauthorized liquor seized in Mangaon | माणगावमध्ये विनापरवाना दारू जप्त

माणगावमध्ये विनापरवाना दारू जप्त

 लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : माणगाव रेल्वे स्टेशन येथे विनापरवाना विदेशी दारू बाळगली असता दोघांना माणगाव बीट मार्शल पोलीस पथकांनी पकडून त्यांच्याकडून ६ हजार २२५ रु पयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस आर. वाय. माने यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास माणगाव बीट मार्शल पोलीस नाईक सी. आर. अंबरगे व त्यांचे जोडीदार पोलीस शिपाई आर. वाय. माने हे माणगाव रेल्वेस्टेशन येथे गस्त घालत असताना त्यांना या व्यक्ती संशयास्पद वावर करताना दिसल्या. त्यांच्या सामानाची झाडाझडती घेतली असता बॅगेतून बीट मार्शल यांना विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्या. यामध्ये पाच हजार पाचशे रुपये किमतीची मॅकडोल्ड नंबर वन कंपनीचे लेबल असलेल्या काचेच्या १८० मिलीच्या दारूच्या बाटल्या एकूण १०० नग प्रत्येकी किंमत ५५ रु पये, २०० रु . किमतीचे इम्पेरियल ब्लू कंपनीचे लेबल असलेली ७५० मिलीची दारूची बाटली एक नग, ५२५ रु . किमतीचे ओल्ड मंक कंपनीचे लेबल असलेल्या ७५० मिलीच्या तीन बाटल्या, एकूण तीन नग प्रत्येकी किंमत १७५ रु. प्रतिनग असा एकूण सहा हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून विजय धोंडू वाडकर (४३, रा. कल्याण, जि. ठाणे, मूळ दाभोळ, जि. रत्नागिरी) व संतोष धोंडू ठोंबर (४०, रा. वरची ठोंबरेवाडी, जि. रत्नागिरी) या दोघांना अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास माणगाव परि. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. एम. एम. भोईर करीत आहेत.
 

 

Web Title: Unauthorized liquor seized in Mangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.