शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान प्रकरण, नारायण राणे दोषमुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 22:25 IST

अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांनी नारायण राणे यांना गुन्ह्यातून दोषमुक्त केल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राणे याना मोठा दिलासा मिळाला आहे. 

अलिबाग :  तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल शनिवारी १ एप्रिल २०२३ रोजी लागला. अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांनी नारायण राणे यांना गुन्ह्यातून दोषमुक्त केल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राणे याना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जन आशीर्वाद यात्रे निमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे याची सोमवारी 23 ऑगस्ट २०२१ रोजी दक्षिण रायगडमध्ये यात्रा सुरू झाली होती. या यात्रे दरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात भा द वी कलम १५३ अ (१), (ब) १५३, अ (१), (क), १८९, ५०४, ५०५ (२), ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. राणे याना संगमेश्वर येथून अटक केली होती. महाड न्यायलयाने राणे यांना जामीन मंजूर केला होता. 

महाड न्यायलायातून हा खटला अलिबाग येथे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात वर्ग झाला होता. १ डिसेंबर २०२२ रोजी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने राणे याना दिले होते. त्यानुसार नारायण राणे हे आपल्या वकिलासह न्यायालयात हजर झाले. राणे यांचे वकील ऍड सतीश माने शिंदे यांनी दाखल केलेला गुन्हा हा खोटा असून त्यातून दोषमुक्त करावे आणि सुनावणीला हजर न राहण्यास परवानगी मिळावी यासाठी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांच्याकडे अर्ज केला आहे. 

नारायण राणे यांच्या विरोधातील युक्तिवाद हा न्यायालयात पूर्ण झाला होता. निकाल येणे बाकी होते. शनिवारी १ एप्रिल २०२३ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांनी नारायण राणे यांना आरोपातून दोषमुक्त केले आहे. ऍड सतीश माने शिंदे याच्या सोबत ऍड अंकित बंगेरा यांनी राणेच्या वतीने काम पाहिले. राणे यांना आरोपातून दोषमुक्त केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेCourtन्यायालय