पनवेल इथं वाहन तळाच्या बांधकामावेळी भिंत कोसळल्याने दोन कामगार जखमी
By नामदेव मोरे | Updated: May 2, 2024 11:30 IST2024-05-02T11:30:12+5:302024-05-02T11:30:27+5:30
एक कामगार थोड्याफार प्रमाणात जखमी झाला तर दुसरा कामगार जास्त जखमी झाला आहे

पनवेल इथं वाहन तळाच्या बांधकामावेळी भिंत कोसळल्याने दोन कामगार जखमी
मयुर तांबडे
नवीन पनवेल :पनवेल शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह समोर वाहन तळाचे काम सुरू आहे. या ठिकाणी वाहन तळासाठी भिंत बांधण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आज दोन मे रोजी या ठिकाणी दोन कामगार माती काढण्याचे काम करत असताना त्यांच्या अंगावर भिंत कोसळली. यात दोघेजण जखमी झाले.
यावेळी एक कामगार थोड्याफार प्रमाणात जखमी झाला तर दुसरा कामगार जास्त जखमी झाला आहे. त्या ठिकाणी नव्याने भिंत बांधण्याचे काम सुरू होते. माती काढत असताना ही भिंत दोघांच्या अंगावर कोसळ.ली त्यामुळे दोघेजण जखमी झाले. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने जखमी कामगाराला बाहेर काढण्यात आले त्याला उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले. यावेळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.