नागोठणेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:50 IST2019-07-09T22:49:49+5:302019-07-09T22:50:02+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर-दुचाकीची धडक

Two-wheeler accident in Nagathane accident | नागोठणेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागोठणेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागोठणे : वेगात ट्रेलर (डी एन ०९ एम ९८०७) आणि मोटारसायकल (एमएच ०६ बी वाय ४१५४) यांच्यात समोरासमोर झालेल्या धडके त दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३०च्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर बाहेरशीव फाट्यावर असणाऱ्या हर्ष धाब्यानजीक घडला.


अपघातात जागीच मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव अ. रजाक अ. रेहमान उलडे (५३) असे असून ते मुरुडचे रहिवासी आहेत. ट्रेलर नागोठणे बाजूकडे, तर मोटारसायकल वडखळ बाजूकडे जात होती.

अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस दर्जाचा डॉक्टर नसल्याने शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह रोहे येथे नेण्याची वेळ आल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता तरी यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Two-wheeler accident in Nagathane accident