खंडाळा घाटात दुचाकी अपघात

By Admin | Updated: May 3, 2016 00:50 IST2016-05-03T00:50:57+5:302016-05-03T00:50:57+5:30

खोपोलीत अपघाताचे प्रमाण वाढत असून रविवारी लोणावळा येथे मित्राबरोबर लग्नाला गेलेल्या तरुणाच्या दुचाकीला खंडाळा (बोर) घाटातून खोपोलीत येत असताना झाडावर

Two-wheeler accident in Khandala Ghat | खंडाळा घाटात दुचाकी अपघात

खंडाळा घाटात दुचाकी अपघात

वावोशी : खोपोलीत अपघाताचे प्रमाण वाढत असून रविवारी लोणावळा येथे मित्राबरोबर लग्नाला गेलेल्या तरुणाच्या दुचाकीला खंडाळा (बोर) घाटातून खोपोलीत येत असताना झाडावर आदळून भीषण अपघात झाला. त्यात तो तरुण जागीच ठार झाला तर त्याच्याबरोबर असणारा मित्र गंभीर जखमी झाला.
१ मे रोजी निखील गुरव (२५) हा त्याच्या मित्रांबरोबर लोणावळा येथील नारायणी धाम येथे लग्न समारंभासाठी गेला होता. तो लग्न सोहळा उरकून रात्री उशिरा वेगो स्कुटी क्र .एमएच ४६ आर १९७० वरून खोपोलीकडे येण्यासाठी मित्रांसह निघाला. मित्र समीर पाटील (रा. खानाव) हे दोघेजण रात्री १२.४० च्या दरम्यान बोरघाटातून खोपोलीत उतरत असताना सायमालजवळ आल्यावर स्कुटीवरील ताबा सुटल्याने वळणावर असणाऱ्या झाडावर आदळून अपघात झाला.

Web Title: Two-wheeler accident in Khandala Ghat