महाडजवळ दोन टेम्पोची समोरासमोर धडक; एक जखमी
By Admin | Updated: March 20, 2017 02:13 IST2017-03-20T02:13:11+5:302017-03-20T02:13:11+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहरानजीक मोहोप्रे फाट्याजवळ दोन टेम्पोची समोरासमोर जोरदार ठोकर होवून एक टेम्पो रस्त्यावरच

महाडजवळ दोन टेम्पोची समोरासमोर धडक; एक जखमी
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहरानजीक मोहोप्रे फाट्याजवळ दोन टेम्पोची समोरासमोर जोरदार ठोकर होवून एक टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला. रविवारी दुपारी १.३० वा. च्या सुमारास गांधारपाले गावच्या हद्दीत घडलेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा अर्धा तास खोळंबा झाला. महामार्ग पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावर पलटी झालेला टेम्पो बाजूला केला. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात
आली.
मुंबईहून रत्नागिरीकडे मैदा
घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले व समोरून भरधाव येणाऱ्या टेम्पोची ठोकर लागून हा टेम्पो मैद्याच्या पोत्यासह महामार्गावर पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)