पावसाळी पिकनिक बेतली जीवावर, पेण पाबळ येथील नदीत दोन सख्खे भाऊ बुडाले
By राजेश भोस्तेकर | Updated: July 17, 2023 22:36 IST2023-07-17T22:34:23+5:302023-07-17T22:36:05+5:30
दोन्ही भावाचे मृतदेह हे शवविच्छेदन साठी पेण उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. शवविच्छेदननंतर दोघांचे मृतदेह कुटुंबाकडे देण्यात आले.

पावसाळी पिकनिक बेतली जीवावर, पेण पाबळ येथील नदीत दोन सख्खे भाऊ बुडाले
अलिबाग : पावसाळी पिकनिकसाठी आलेल्या थेरोंडा रेवदंडा येथील दोन सख्ख्या भावंडाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना पेण तालुक्यातील पाबळ येथे सोमवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेमुळे वासकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही भावाचे मृतदेह हे शवविच्छेदन साठी पेण उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. शवविच्छेदननंतर दोघांचे मृतदेह कुटुंबाकडे देण्यात आले.
थेरोंडा रेवदंडा, ता.अलिबाग येथून चार तरुण पावसाळी पिकनिक साठी पेण तालुक्यातील पाबळ येथे सोमवारी आले होते. पाबळ येथील बरडावाडी परिसरात नदीमध्ये पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने इलान बेंजामीन वासकर ( वय २५) व इजरायल बेंजामीन वासकर ( वय २२) हे दोन सख्खे भाऊ वाहून गेले. या बाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच शोधा शोध केली असता दोन्ही भावांचे मृतदेह हाती लागले. या प्रकरणाची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर हे करत आहेत.