वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार , मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:19 AM2018-01-20T02:19:02+5:302018-01-20T02:19:05+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. खोपोली एक्झिटजवळ शुक्रवारी सकाळी ७.३०च्या सुमारास झालेल्या

Two killed in various accidents, two in Mumbai-Pune expressway | वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार , मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घटना

वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार , मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घटना

Next

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत.
खोपोली एक्झिटजवळ शुक्रवारी सकाळी ७.३०च्या सुमारास झालेल्या अपघातात कार कंटेनरला धडकून कारमधील एक महिला मृत्युमुखी पडली, तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. दुसरा अपघात सकाळी ८.३०च्या सुमारास मुंबई लेनवर कि.मी. २७ माडपजवळ घडला. यात वेगवान कार पलटी झाल्यामुळे गंभीर अपघात होऊन कारमधील अब्दुल हमीद गुलबुर्गी (७५ रा. गुलबर्गा, कर्नाटक) हे गंभीर जखमी झाले असून, सईदा अब्दुल करीम (६०, रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करीत आहे.

Web Title: Two killed in various accidents, two in Mumbai-Pune expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.