नडगावजवळील अपघातात दोघे जखमी
By Admin | Updated: July 6, 2017 06:29 IST2017-07-06T06:29:02+5:302017-07-06T06:29:02+5:30
महाड तालुक्यातील नडगाव गावाजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर ५ जुलै रोजी कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात

नडगावजवळील अपघातात दोघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
बिरवाडी/महाड : महाड तालुक्यातील नडगाव गावाजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर ५ जुलै रोजी कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह एक जण गंभीर जखमी झाला आहे.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नडगाव गावच्या हद्दीत स्विफ्ट कार क्र मांक एमएच १२ इके १३२१ हिला महाडकडून चांढवेकडे जाणाऱ्या मोटारसायकल क्र मांक एम एच ०६ बी क्यू ७१८३ वरील मोटारसायकलस्वार राहुल चाळके (२८) याने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान होऊन राहुल चाळके, किशोर शिंदे हे जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर महाड ग्रामीण
रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली
नाही.