शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 06:03 IST

अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे (रा. सावर, गौळ आळी, ता. म्हसळा, जि. रायगड) आणि सुनील पांडुरंग तटकरे (मु. पोयनार, अलाटी वाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे दोघे ११ एप्रिलपासून बेपत्ता आहेत.

जयंत धुळप अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे (रा. सावर, गौळ आळी, ता. म्हसळा, जि. रायगड) आणि सुनील पांडुरंग तटकरे (मु. पोयनार, अलाटी वाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे दोघे ११ एप्रिलपासून बेपत्ता आहेत.निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून त्याच्या खर्चाचा दैनंदिन हिशेब देणे बंधनकारक आहे. रायगड लोकसभा निवडणूक रिंगणातील सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या उमेदवारांनी अद्याप त्यांच्या खर्चाचा कोणताही हिशेब दिलेला नाही. तसेच ते खर्च ताळमेळ बैठकांनाही उपस्थित राहिलेले नाहीत. परिणामी, या दोन्ही उमेदवारांना रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी त्यांना नोटिसा बजावल्या.११ एप्रिल व १६ एप्रिल या तारखांना झालेल्या खर्च ताळमेळ बैठकांना अनुपस्थित राहून व कुठलाही निवडणूकविषयक खर्च सादर न केल्याने या उमेदवारांनी निवडणूक कायद्याचा भंग केला आहे. याबाबत दोन दिवसांत त्यांनी खुलासा दिला नाही, तर निवडणूक कायद्यान्वये पुढील कडक कारवाई करण्यात येईल, असे रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नोटीशीत नमूद केले आहे.११ एप्रिलपासून या उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाइल नंबर्सवर संपर्क साधण्याचा प्रयत्न निवडणूक यंत्रणेने केला; परंतु तो होऊ शकला नाही. त्यांच्या घरच्या पत्त्यावरही संपर्क झाला नाही. परिणामी, अखेर गुरुवारी त्या दोन्ही उमेदवारांना या नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती सूर्यवंशीयांनी दिली.>दोन दिवसांची मुदत अन्यथा कारवाईदोन दिवसांत सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या दोन्ही उमेदवारांनी खर्च सादर केला नाही, तर निवडणूक कायद्यान्वये या दोन्ही उमेदवारांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते, अशीही माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणूक रिंगणातील असलेल्या १६ पैकी १४ उमेदवारांनी खर्च ताळमेळ बैठकीस उपस्थित राहून आपले खर्चलेखे सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेraigad-pcरायगड