नावंडे जंगलात आढळले दोन मृतदेह
By Admin | Updated: March 15, 2016 00:53 IST2016-03-15T00:53:27+5:302016-03-15T00:53:27+5:30
तालुक्यातील नावंडे ग्रामपंचायत हद्दीत गावापासून काही अंतरावर डोंगराळ भागात एका महिलेचा आणि पुरुषाचा असे दोन मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ

नावंडे जंगलात आढळले दोन मृतदेह
खालापूर : तालुक्यातील नावंडे ग्रामपंचायत हद्दीत गावापासून काही अंतरावर डोंगराळ भागात एका महिलेचा आणि पुरुषाचा असे दोन मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली नसल्याने हा घात की अपघात, हे आताच सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदनाच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर या घटनेचे गूढ समोर येईल, असे खालापूर पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांनी सांगितले आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान नावंडे ग्रामपंचायत हद्दीत गावापासून काही अंतरावर डोंगराळ भागात एका आदिवासी जोडप्याचे मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती खालापूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता, मृतदेह हे तीन-चार दिवसांपूर्वीचे असल्याचे निदर्शनास आले. एकाचा मृतदेह जागेवरून हलवता येत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवर शवविच्छेदन केले. स्थानिकांच्या माहितीनुसार, हे वाघमारे जोडपे मूळ बदलापूरचे रहिवासी असून, कामानिमित्त ते या परिसरात राहण्यास आले होते.