पेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोन आरोपींना अटक

By Admin | Updated: May 4, 2016 03:26 IST2016-05-04T03:26:03+5:302016-05-04T03:26:03+5:30

पेण अर्बन बँक घोटाळ््यातील आणखी दोन आरोपींना पेण पोलिसांनी पेण येथून २ मे रोजी अटक केली. त्यांना विशेष न्यायायलात हजर केले असता न्यायाधीश के. आर. पेठकर

Two accused arrested in Pen-Urban Bank scam | पेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोन आरोपींना अटक

पेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोन आरोपींना अटक

अलिबाग / पेण : पेण अर्बन बँक घोटाळ््यातील आणखी दोन आरोपींना पेण पोलिसांनी पेण येथून २ मे रोजी अटक केली. त्यांना विशेष न्यायायलात हजर केले असता न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी दोन्ही आरोपींना १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती जिल्हा सरकारी सहायक वकील अ‍ॅड. वैभव भोळे यांनी दिली. आतापर्यंत या प्रकरणात ५५ आरोपींना अटक करण्यात आली असून ३३ आरोपी अद्यापही फरार आहेत.
या घोटाळ््यातील आरोपी संतोष शुंगारपुरे यांनी स्वानंद कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यामध्ये प्रतोष सिंग आणि शांताराम पाटील हे संचालक होते. त्यांनी दादर शाखेतून सात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज बोगस असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी झालेल्या चौकशीत घोटाळ््यामध्ये दोघांचा सहभाग असल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर पेण पोलिसांनी सिंग आणि पाटील यांना अटक केली. (प्रतिनिधी)
मोक्का लावण्याची काँग्रेसची मागणी
काँग्रेस पक्षाच्यातर्फे अर्बन बँक प्रकरणी ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना मोक्का लावण्याची मागणी पत्रकार परिषदेत पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी केली. यामध्ये त्यांनी पेणचे माजी नगराध्यक्षांवर आरोप करीत त्यांच्या अटकेची मागणी केली.
स्वानंद कन्स्ट्रक्शनने शासनाची व ठेवीदारांची फसवणूक केली असून याबाबत सर्व माहिती रायगड पोलीस अधीक्षक व जिल्हा प्रशासनाला देवून, माजी नगराध्यक्ष या बोगस कर्ज प्रकरणाचे सूत्रधार आहेत. आमच्यावर खोटे आरोप करून त्यातील एकही सिद्ध न करणारे पेण अर्बन प्र्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना या प्रकरणी अटक केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस पक्षाने के ला.

Web Title: Two accused arrested in Pen-Urban Bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.