अलिबाग-मांडवा-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी मंजूर
By Admin | Updated: April 28, 2017 00:26 IST2017-04-28T00:26:12+5:302017-04-28T00:26:12+5:30
अलिबाग - रेवस रस्त्यासाठी १२ कोटी २५ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अलिबाग ते रेवस दरम्यानच्या

अलिबाग-मांडवा-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी मंजूर
अलिबाग : अलिबाग - रेवस रस्त्यासाठी १२ कोटी २५ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अलिबाग ते रेवस दरम्यानच्या गावांतील जनतेची गैरसोय दूर होणार आहेत, त्याचबरोबर गेटवे आॅफ इंडिया मुंबई ते अलिबाग ही सागरी प्रवासी वाहतूक येत्या काही महिन्यात बारमाही होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा रस्ता अत्यंत सक्षम असणे आवश्यक असल्याने केलेल्या लेखी मागणीस बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता देवून, अर्थसंकल्पात ही खास तरतूद करण्यात आलीअसल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
अलिबाग - रेवस आणि अलिबाग - रोहा हे दोन महत्त्वाचे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी आ. जयंत पाटील आणि आ. पंडित पाटील या बंधूंनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून या मार्गावरील रस्ते तातडीने दुरस्त करण्यात यावेत अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेवून शासनाने अलिबाग- रेवस मार्गावरील रस्त्यासाठी अर्थसंकल्पात १२ कोटी २५ लाख रु पयांची तरतूद केली. मात्र अलिबाग- रेवस रस्त्यासाठी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचा अद्यापही कार्यादेश काढण्यात आला नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या मार्गावरील प्रवाशांना खड्ड्यांतून प्रवास करण्याची वेळ आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबाग - रोहा मार्गावरील ८० क़ि .मी रस्त्यासाठी ७५ कोटी रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता एकूण १० मीटर रु ंद होणार असून त्यातील काही भाग सिमेंट काँक्र ीट व काही भाग डांबरीकरणाद्वारे तयार केला जाणार आहे. संबंधित विभागाकडून त्याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हा ही रस्ता होईल असे आ.पाटील यांनी सांगितले.