शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

"राज्य सरकारवर केवळ टीका करण्यापेक्षा एनडीआरएफचे निकष बदलण्याचे प्रयत्न करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 02:42 IST

सुनील तटकरे यांच्या कानपिचक्या : निसर्ग वादळातील मदत वाटपाबाबत तपशील जाहीर

रायगड : राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा एनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करा, अशा कानपिचक्या खासदार सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना दिल्या. निसर्ग वादळातील मदत वाटपाबाबतच्या पत्रकार परिषदेत ते अलिबाग येथे बोलत होते.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मदत वाटपात दुजाभाव होत असल्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याला खासदार तटकरे यांनी उत्तर दिले. पश्चिम बंगाल आणि ओडीसा राज्यातील वादळाबाबत केंद्र सरकारने एनडीआरएफच्या निकषात बदल केले. त्यामुळे त्या राज्यांना आता केंद्राचा निधी मिळण्यातील अडसर दूर झाला आहे. मात्र कोकणासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफच्या निकषात बदल करावेत अशी सर्वप्रथम मागणी आम्ही केली, असे खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले.

कोकणात मदत वाटपाबाबत राज्य सरकारने योग्य ते निर्णय घेतले आहेत. मात्र नुसती टीका करण्यापेक्षा फडणवीस आणि दरेकर यांनी कोकणासाठी एनडीआरएफच्या निकषात बदल करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे खडे बोल तटकरे यांनी सुनावले. एका दिवासात दौरे करुन कोकणी माणसाच्या मनातील वादळाची व्यापकता कळणार नाही. त्यासाठी शेताच्या बांधापासून ते मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागते असेही तटकरे यांनी सुनावले. नारळ आणि सुपारीसाठी वाढीव मदत देण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मान्य केले आहे.पर्यटन निवारा चालकांचेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकसान झाले आहे. काहींनी कर्ज काढून व्यवसाय सुरु केले आहेत. त्यामुळे पर्यटन आणि उर्जा विभाकडून माहिती मागवून त्यांना काही सवलत देता येईल का? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेPraveen Darekarप्रवीण दरेकरCentral Governmentकेंद्र सरकारCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ