‘शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करा’
By Admin | Updated: April 14, 2016 00:10 IST2016-04-14T00:10:32+5:302016-04-14T00:10:32+5:30
म्हसळा तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन म्हसळा पंचायत समितीचे सभापती नजीम हसवारे यांनी केले आहे.

‘शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करा’
म्हसळा : म्हसळा तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन म्हसळा पंचायत समितीचे सभापती नजीम हसवारे यांनी केले आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत म्हसळा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची आढावा बैठक नवनिर्वाचित सभापती हसवारे यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा कन्याशाळेत संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस तालुक्याच्या शिक्षण समन्वय समितीचे माजी अध्यक्ष अनंत सावंत उपस्थित होते.
पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी डॉ.तुषार जाधव यांनी पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी सर्वांनी मनापासून कामाला लागणे आवश्यक असल्याचे सांगितले. तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने सुधीर वारळकर यांनी सभापती हसवारे यांचा यावेळी सत्कार केला. शैक्षणिक प्रगती करण्यासाठी सवच शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी मेहनत घ्यावी, असे जाधव यांनी सांगितले.