ट्रकची कारला धडक; दोघे जखमी

By Admin | Updated: November 14, 2016 04:22 IST2016-11-14T04:22:48+5:302016-11-14T04:22:48+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर वहूर गावचे हद्दीत शनिवारी रात्री १०.४५ च्या दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका कारला मागून जोराची धडक

Truck car hit; Both injured | ट्रकची कारला धडक; दोघे जखमी

ट्रकची कारला धडक; दोघे जखमी

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर वहूर गावचे हद्दीत शनिवारी रात्री १०.४५ च्या दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका कारला मागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक तिथेच टाकून पळून गेला.
मुंबईहून देवगडकडे जाणारी कार ही वहूर गावचे हद्दीत आल्यानंतर त्याच दिशेला जाणारा वाळूने भरलेला ट्रक भरधाव वेगाने येवून कारला मागून जोराची धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील भारगाव नंदकुमार राणे व त्यांनी पत्नी सरिता राणे रा. मुलुंड ठाणे दोघेही प्रवासी जखमी झाले.

Web Title: Truck car hit; Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.