प्रवासात महिलेचे दागिने लंपास

By Admin | Updated: May 5, 2016 00:38 IST2016-05-05T00:38:11+5:302016-05-05T00:38:11+5:30

तालुक्यात चोरी, घरफोडी, लुटमारीचे प्रकार सर्रास घडत असून चोर-पोलिसांचा खेळ काही थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पोलिसांनी धावपळ सुरू आहे. भरदिवसा प्रवासी

Travel women's lamps | प्रवासात महिलेचे दागिने लंपास

प्रवासात महिलेचे दागिने लंपास

रोहा : तालुक्यात चोरी, घरफोडी, लुटमारीचे प्रकार सर्रास घडत असून चोर-पोलिसांचा खेळ काही थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पोलिसांनी धावपळ सुरू आहे. भरदिवसा प्रवासी महिलेची बॅग कापून चोरी करण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
आदर्श नगर भुवनेश्वर येथे कोर्टाशेजारी राहणाऱ्या सुप्रिया राजीवडे व नेहा राजीवडे या माय-लेकी मालाड मुंबई येथील नातेवाईकांच्या लग्नानिमित्त गेल्या होत्या. लग्न उरकून घरी परत येत असताना त्या दोघी कोलाड येथे उतरल्या. कोलाडहून मिनीडोर रिक्षाने रोह्याकडे प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्यांनी संबंधित महिलेजवळील कपड्याची टूर बॅग एका बाजूकडून धारदार हत्याराने कापून बॅगेतील प्लास्टीक डब्यातील सोन्याची चेन, हार, कानातले रिंग, अंगठ्या, सोन्याचा शिक्का व सुटे सोने, नथ, मंगळसूत्र वाटी, कानातील साखळी असा एकूण १ लाख २९ हजार रु. किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. (वार्ताहर)

Web Title: Travel women's lamps