नेरळमध्ये कचराप्रश्न गंभीर; योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:12 IST2019-03-30T00:12:42+5:302019-03-30T00:12:54+5:30
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याने नागरिक हैराण झाले आहेत, या कचऱ्यामुळे मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. हा कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उचलून योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

नेरळमध्ये कचराप्रश्न गंभीर; योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी
नेरळ : नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याने नागरिक हैराण झाले आहेत, या कचऱ्यामुळे मोकाट गुरे आणि कु त्र्यांचा त्रास वाढला आहे. हा कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उचलून योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विस्ताराने, लोकसंख्येने आणि आर्थिकदृष्ट्या जिल्ह्यात नेरळ ग्रामपंचायतीचा प्रथम क्र मांक लागतो. जवळच असलेल्या कर्जत नगरपरिषदेपेक्षा नेरळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास २५००० एवढी लोकसंख्या नेरळ ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्नही जास्त आहे. ग्रामपंचायत हद्दीत नागरीकरणही मोठ्या प्रमाणात आहे. नेरळ बाजारपेठेतील वाहतूककोंडी त्यांनी फोडली, तर अनेक वर्षे रखडलेले मटण, मच्छी मार्केट स्थलांतर झाले. लोकवस्तीतला कचरा डेपो देखील हटवला, नेरळमधील कचराकोंडी आजही फुटलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. नेरळ ग्रामपंचायतीने नुकत्याच दोन नवीन घंटागाड्या घेतल्या, मोठ्या प्रमाणात सफाई कामगार ग्रामपंचायतीकडे आहेत. मात्र तरीही पाडा, निर्माणनगरी, कर्जत-कल्याण हायवे याठिकणी कचरा कायम पडलेला दिसतो. तर अनेक गृहनिर्माण संस्थांना गतवर्षी ग्रामपंचायत प्रांगणात वाटलेल्या कचरा कुंड्या ओव्हरफ्लो झाल्याचे दिसून येत आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ४२ सफाई कामगार आहेत, ग्रामपंचायत कुठेही कमी पडते असे मला वाटत नाही, उलट आता कचरा वेळेत उचलला जातोय असे ग्रामस्थच मला सांगतात.
- जान्हवी साळुंके, सरपंच, नेरळ ग्रामपंचायत