टेमपालेजवळ ट्रकला अपघात
By Admin | Updated: March 19, 2016 00:46 IST2016-03-19T00:46:20+5:302016-03-19T00:46:20+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाले गावाजवळ शुक्र वारी सकाळी ६.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. अपघातात ट्रकच्या केबिनचे तुकडे

टेमपालेजवळ ट्रकला अपघात
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाले गावाजवळ शुक्र वारी सकाळी ६.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. अपघातात ट्रकच्या केबिनचे तुकडे झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे याचे प्रत्यंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा आले. कराडहून बोर्ली श्रीवर्धनकडे साखर घेऊन (ट्रक क्र मांक एमएच ०६ एक्यू १९७०) ट्रकचालक विशाल निगुडकर निघाला होता. सकाळी ६.३० वाजता टेमपाले गावाच्या हद्दीत आला असता भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक वडाच्या झाडावर जोरात जाऊन आदळला. त्यामुळे ट्रकच्या केबिनचे नुकसान झाले. यावेळी मदतीसाठी मजीद लोखंडे धावून आले. मजीद यांनी चालकाला बाहेर काढले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा चुराडा झाल्याने चालक विशाल निगुडकर (३१, रा. भोस्ते), प्रसाद वाणी (२७, रा.सकलप) व विलास म्हात्रे (३०, रा. सकलप) हे जागीच ठार झाले.
चालक विशाल निगुडकर याचे १७ एप्रिलला लग्न होणार होते अशी माहिती त्याचे नातेवाईक रेवती जवळेकर यांनी दिली. गोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक निशा जाधव उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)