लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : रॉनी आणि झरीना स्क्रू वाला यांच्या स्वदेश फाउंडेशनमार्फत उन्हाळ्यातील सुटीचा सदुपयोग करण्यासाठी महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा या सहा तालुक्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये अब्याकस, वेदिक गणित आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मंगळवारी २ मे ते शनिवार ६ मे रोजी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत आयोजित केले होते. या शिबिरामध्ये सहा तालुक्यातून १०५० विद्यार्थी सहभागी झाले होते.या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना गणित या विषयातील वाढलेला आत्मविश्वास त्यांच्या मनोगतातून समजून आला. विद्यार्थी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार काही सेकंदातच करु लागले आहेत. सर्वच तालुक्यामधील गटशिक्षणधिकारी, केंद्रप्रमुख, शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, विषय शिक्षक, पंचायत समिती सभापती, जि. प. सदस्य यांनी या शिबिराला भेटी दिल्या. शेवटच्या दिवशी सर्वच ठिकाणी समारोप तसेच बक्षीस वितरण समारंभ पार पडला.स्वदेश फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी झरीना स्क्रू वाला यांनी नांदावी, गोरेगाव, माणगाव येथील उन्हाळी शिबिरांना भेटी दिल्या व पालक तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माणगाव येथील समारोप कार्यक्र मस गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर उपस्थित होते. या शिबिरामध्ये यशस्वी झालेल्या प्रत्येक केंद्रावरील तीन विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
स्वदेशमार्फत सहा तालुक्यांत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
By admin | Updated: May 11, 2017 02:07 IST