शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खगोलशास्त्र कॅम्पमध्ये उरण- पनवेलमधील ३६ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 14:05 IST

Raigad News: प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या युथ नेट प्रोग्रॅममध्ये कौशल्य कल्पकता कार्यक्रमांतर्गत देशातील विविध जिल्ह्यातील दहा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

- मधुकर ठाकूर उरण - प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या युथ नेट प्रोग्रॅममध्ये कौशल्य कल्पकता कार्यक्रमांतर्गत देशातील विविध जिल्ह्यातील दहा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यात  चांद्रयान-३ साठी रायगड जिल्ह्यातून मेसेज टू मूनसाठी १४३ विद्यार्थ्यांचे कल्पक संदेश आणि फोटो पाठविण्यात आले होते. त्यापैकी  उरण व  पनवेल तालुक्यातील ३६ विद्यार्थ्यांची या प्रोजेक्टसाठी निवड झाली होती. या  विद्यार्थ्यांसाठी पुढील मार्गदर्शनासाठी नेहरू  सायन्स सेंटर मुंबई येथे कॅम्पमधून खगोलशास्त्र तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमांतर्गत मेसेज टू मून हा उपक्रम घेण्यात आला होता. यामध्ये उरण तालुक्यातील राजिप शाळा मोठीजुई, राजिप शाळा आवरे तर पनवेल तालुक्यातील सुएसो माध्यमिक विद्यालय चिंध्रण, राजिप शाळा सुकापुर, श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वावंजे आदी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.  निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने नेहरू सायन्स सेंटर मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. त्यांना खगोलशास्त्राबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून काही मॉडेल्स बनवून घेण्यात आल्या. त्यामध्ये तारामंडळ, सूर्यमाला, सन इज वन, कंपासच्या साह्याने दिशा कशा शोधल्या जातात. त्याचबरोबर  ग्रहाबद्दल माहिती देण्यात आली.

त्यानंतर कॅम्प पूर्ण केलेल्या सहभागी सर्व विद्यार्थ्यांना नेहरू सायन्स सेंटर मुंबई द्वारा  प्रशस्तीपत्र देण्यात आले.या सर्व विद्यार्थ्यांना कौशल्य कॅम्पमध्ये खूप काही शिकायला मिळाले. मुलांमध्ये  जे सुप्त गुण दडलेले असतात, त्यांना वाव मिळावा याकरीता अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा साजेसा प्रयत्न करत असते. अशी माहिती प्रथम एज्युकेशनच्या जयवंती गोंधळी यांनी दिली.

टॅग्स :RaigadरायगडStudentविद्यार्थी