वाशी-नेरूळदरम्यान आज ट्रॅफिक ब्लॉक; २२ फेऱ्या रद्द

By Admin | Updated: April 29, 2017 01:45 IST2017-04-29T01:45:12+5:302017-04-29T01:45:12+5:30

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर शनिवारी दुपारी १२.३५ ते दुपारी २.३५ या काळात रुळांसह

Traffic block during Vashi-Nerul; 22 rounds canceled | वाशी-नेरूळदरम्यान आज ट्रॅफिक ब्लॉक; २२ फेऱ्या रद्द

वाशी-नेरूळदरम्यान आज ट्रॅफिक ब्लॉक; २२ फेऱ्या रद्द

डोंबिवली : ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर शनिवारी दुपारी १२.३५ ते दुपारी २.३५ या काळात रुळांसह अन्य तांत्रिक देखभालीच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोलकच्या २२ फेऱ्या रद्द होणार आहेत. त्या काळात त्याच तिकीट किंवा पासवर प्रवासी कुर्लामार्गे प्रवास करू शकतील, असे रेल्वेने कळवले आहे.
डाऊनच्या रद्द झालेल्या लोकल : ठाण्याहून वाशीसाठी स्थानकातून दुपारी १२.१२, १२.४०, १.०१, १.२५, १.५७, नेरुळसाठी १२.२०, १.१०, १.३७ तसेच पनवेल स्थानकासाठी १२.५२, ०१.१८, आणि २.०५ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल रद्द होतील.
अपच्या रद्द झालेल्या लोकल : वाशी येथून ठाण्यासाठी दुपारी १२.२१, १२.४९, १.१८, १.४०, ०२.०२.

Web Title: Traffic block during Vashi-Nerul; 22 rounds canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.