माथेरान राणीच्या प्रतीक्षेत पर्यटक

By Admin | Updated: June 2, 2016 01:30 IST2016-06-02T01:30:00+5:302016-06-02T01:30:00+5:30

मिनीट्रेनमधून प्रवास करता यावा यासाठी प्रत्येकाचा अट्टाहास असतो. सर्वच पर्यटक हे सुट्यांच्या हंगामात येथे आवर्जून भेट देत असतात. परंतु ऐन गर्दीच्या वेळी या गाडीचे तिकीट उपलब्ध होत

Tourists waiting for Matheran Queen | माथेरान राणीच्या प्रतीक्षेत पर्यटक

माथेरान राणीच्या प्रतीक्षेत पर्यटक

माथेरान : मिनीट्रेनमधून प्रवास करता यावा यासाठी प्रत्येकाचा अट्टाहास असतो. सर्वच पर्यटक हे सुट्यांच्या हंगामात येथे आवर्जून भेट देत असतात. परंतु ऐन गर्दीच्या वेळी या गाडीचे तिकीट उपलब्ध होत नसल्याने अनेकांचा भ्रमनिरास होताना दिसतो. मात्र ही मिनीट्रेनच बंद असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
उन्हाळी शेवटच्या सुट्यांच्या हंगामात अनेक जण खासकरून मिनीट्रेनची डोंगर दऱ्यामधील सफरीची अनुभूती घेण्यास आले असता दोनदा या गाडीची बोगी घसरली होती. त्यामुळे ही सेवा बंद करण्याचा कठोर निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे स्थानिक व पर्यटकांंच्या सोयीसाठी येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. तेव्हा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अमनलॉज ते माथेरान स्टेशनपर्यंत शटल सेवा सुरू होण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. याबाबतीत दोनदा चाचणी देखील घेण्यात आली आहे. परंतु रेल्वे सुरक्षा आयुक्त स्वत: ही चाचणी घेणार असल्याने अजून तरी आठवडा लागणार आहेच, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली. गाडी सुरू नाही हे पर्यटक व स्थानिकांसाठी दुर्भाग्यच म्हणावे लागेल. यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर थोडा परिणाम होत आहे. मात्र हरित महोत्सवाने पर्यटकांना आकर्षित केल्यामुळे स्थानिकांची आर्थिक उणीव काहीशा प्रमाणात भरून काढली असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. नवखे पर्यटक स्टेशनवर येऊन येथे दिमाखात उभ्या असणाऱ्या शतकी पार केलेल्या कोळशाच्या इंजिनजवळ उभे राहून फोटो काढून मिनीट्रेनची हौस भागवत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Tourists waiting for Matheran Queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.