शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

‘जेरु सलेम गेट’ होणार पर्यटन स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:26 AM

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे आश्रयाला उतरले. भारतात ज्यू लोकांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते नवगाव ज्यू धर्मीयांमध्ये पवित्र ‘जेरु सलेम गेट’ म्हणून ओळखले जाते.

जयंत धुळप अलिबाग : सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे आश्रयाला उतरले. भारतात ज्यू लोकांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते नवगाव ज्यू धर्मीयांमध्ये पवित्र ‘जेरु सलेम गेट’ म्हणून ओळखले जाते. याच ‘जेरुसलेम गेट’ स्थळाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. यासाठी इस्रायलमध्ये गेलेल्या ज्यू बांधवांनी रविवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून नवगावला भेट दिली आणि भारतातील पहिल्या आश्रयस्थळाचा विकास करण्याचा संकल्प जाहीर करून, भारत-इस्रायल मैत्रीचा गोडवा वृद्धिंगत केला आहे.रविवारी इस्रायलमधील तब्बल २०० ज्यू नागरिकांनी नवगावला भेट दिली. यामध्ये अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या ज्यू बांधवांचाही समावेश होता, अशी माहिती अलिबागेतच लहानाचे मोठे झालेले आणि सध्या इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेले जोनाथान मोझेस वाक्रुळकर यांनी दिली.ज्यू बांधवांनी नवगाव येथे आ. जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना ‘जेरुसलेम गेट’ या पवित्रस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी नवगावातील ‘जेरु सलेम गेट’ या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला जाणार असून पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल, असे आश्वासन दिले. हिंदू-ज्यू संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत, यासाठी जगभरातून नवगाव येथे आलेल्या ज्यू बांधवांनी आमदार जयंत पाटील यांना तीळगूळ देवून मैत्रीचा धागा अधिक बळकट केला.रायगडमधून ज्यू लोक जाऊन मोठा कालावधी लोटला आहे, तरीही त्यांनी येथील मातीशी नाते तोडलेले नाही. नवगाव या ठिकाणी दुरवस्थेत असलेले हे स्थळ विकसित केल्यास भारत आणि इस्रायलमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास आ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.‘जेरु सलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतीकज्यू धर्मीयांवर जगातील अनेक देशांमध्ये अत्याचार झाले. मात्र, भारतात आलेल्या ज्यू धर्मीयांना सन्मानाची वागणूक मिळाली. दोन हजार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत हा समाज येथील इतर समाजाशी पूर्णपणे एकरूप झाला. आजच्या घडीला जगभर दहशतवादी हल्ले वाढत असताना ‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतीक होईल, अशी भावना इस्रायलमधील ज्येष्ठ ज्यू बांधव जॉनाथॉन सोलमन यांनी व्यक्त केली.पन्नास वर्षांनंतरही आश्रयस्थळाशी नाते कायमज्यू बांधव नवगाव येथून इस्रायलमध्ये गेले त्या घटनेला पन्नास वर्षांपेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे, तरीही त्यांचे आश्रयस्थळाशी असलेले नाते अजिबात तुटलेले नाही. आलेल्या ज्यू बांधवांपैकी बहुतेकजण उत्तम मराठीतूनच बोलत होते. येथे आल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे जुने सहकारी भेटल्याने अनेक जण या जुन्या आठवणीने भारावून गेले होते.