शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

रायगडमधील पर्यटनस्थळे बहरली, धुळवड साजरी करण्यासाठी पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 01:02 IST

शनिवार, रविवार सुट्टीमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे ही पर्यटकांनी बहरून गेली आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

अलिबाग - शनिवार, रविवार सुट्टीमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे ही पर्यटकांनी बहरून गेली आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. समुद्रकिनारी जलक्रीडा, घोडागाडी, उंट सफारी, एटीव्ही सफारीचा आनंद पर्यटक लुटत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानेही खबरदारीची पावले उचलली आहेत.सलग आलेल्या सुट्ट्या आणि धुळवड साजरी करण्यासाठी पर्यटकांनी रायगडला पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे २६ मार्चपासून जिल्ह्यात हजारो पर्यटक मजा करण्यासाठी दाखल झाले आहेत. मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यांतून पर्यटक जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अलिबाग, नागाव, आक्षी, वरसोली, रेवदंडा, काशीद, मुरुड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर समुद्रकिनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले आहेत.समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना समुद्र स्नानासह सुविधा उपलब्ध आहेत. जलक्रीडामध्ये बोटिंग, बनाना, जेट्सकी राइडचा आनंद पर्यटक लुटत आहेत. जलक्रीडा व्यावसायिक हे पर्यटकांना पॅकेज देत असून सुरक्षित आणि काळजी घेऊन राइड करीत आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही आर्थिक लाभ होत आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी नाके तैनात केले आहेत. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल्ल२६ मार्चपासून हजारो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक आनंदित आहेत. हॉटेल, रिसॉर्टही हाउसफुल्ल झाले आहेत. कोरोनानंतर साधारण एक महिन्यानंतर हॉटेल, व्यावसायिक यांना पर्यटकांमुळे आर्थिक फायदा होत आहे. येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे.जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची तपासणीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही खबरदारीची पावले उचलली जात आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच पुढे सोडले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटन