पर्यटनाची माहिती देणारे मशिन चेजिंग रूममध्ये!

By Admin | Updated: July 25, 2015 22:42 IST2015-07-25T22:42:08+5:302015-07-25T22:42:08+5:30

शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोफत मिळालेल्या यंत्रसामग्रीची कशी धूळधाण होते हे नवीन नाही. मुरुड नगरपरिषदेसाठी गेल्या ३ आॅगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र

Touring machine in the machine cheating room! | पर्यटनाची माहिती देणारे मशिन चेजिंग रूममध्ये!

पर्यटनाची माहिती देणारे मशिन चेजिंग रूममध्ये!

मुरुड : शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोफत मिळालेल्या यंत्रसामग्रीची कशी धूळधाण होते हे नवीन नाही. मुरुड नगरपरिषदेसाठी गेल्या ३ आॅगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून दिल्या गेलेल्या ‘कोईक्स’ मशिनला वर्षभर न हाताळल्यामुळे या मशिन भंगारात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुरुड हे पर्यटन केंद्र असल्यामुळे आलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रातल्या मुख्य पर्यटनस्थळांची माहिती तथा लॉजिंग, बोर्डिंगची सुविधा कशा पध्दतीने मिळेल हे एका क्लिकवर कोईक्स मशिनद्वारे समजू शकते. गेल्या वर्षी ३ आॅगस्टला तत्कालीन जिल्हाधिकारी सुमंत भांगे, तत्कालीन नगराध्यक्ष अ. रहीम कबले आदींच्या प्रमुख उपस्थितीत मुरुड येथील समुद्र किनारी असलेल्या विश्राम बागेच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात पर्यटन सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे एक मशिन गोल्डन स्वॉन रिझॉर्ट येथे तर दुसरी मुरुड नगरपरिषदेला विनामूल्य देण्यात आली. हे मशिन सुरक्षित राहण्यासाठी एका चेंजिंग रुममध्ये ठेवण्यात आले. मात्र मशिनची साधी देखभाल व माहिती देण्यासाठी एक कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आला नाही. मुरुड नगरपरिषदेने समुद्रकिनारी चेजिंग रुममधील मशिन दुरुस्त करून पर्यटकांसाठी उपलब्ध करून द्यावे, अथवा नगरपरिषदेमध्ये स्थलांतरित करून पर्यटकांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी वंदना गुळवे म्हणाल्या की, आम्ही फोर्ब्स या कंपनीकडे टेक्निशियनची मागणी केली. परंतुु दुरुस्तीव्यतिरिक्त कंपनीने कुठलीही जबाबदारी घेतली नाही. समुद्रकिनारी असलेले हे मशिन नगरपरिषदेत बसवावे असे सांगत होतो, परंतु आमचे म्हणणे ऐकले नाही. या विषयी फोर्ब्स कंपनीचे मुंबई येथील रिजनल सर्व्हिस मॅनेजर अशोक नय्यर यांनी फोर्ब्स कंपनीकडे निव्वळ मेंटेनन्सची जबाबदारी असल्याचे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Touring machine in the machine cheating room!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.