शिवसेनेचा प्रांत कार्यालयावर आज मोर्चा

By Admin | Updated: April 2, 2016 02:53 IST2016-04-02T02:53:14+5:302016-04-02T02:53:14+5:30

चवदार तळे जलपूजनाबाबत शिवसेना आ. भरत गोगावले यांच्याविषयी सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसिद्ध करून आ. गोगावले यांची बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई

Today's rally on Shivsena's province's office | शिवसेनेचा प्रांत कार्यालयावर आज मोर्चा

शिवसेनेचा प्रांत कार्यालयावर आज मोर्चा

महाड : चवदार तळे जलपूजनाबाबत शिवसेना आ. भरत गोगावले यांच्याविषयी सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसिद्ध करून आ. गोगावले यांची बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी शिवसेनेतर्फे प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता शिवाजी चौक येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून, बालाजी मंदिरमार्गे बाजारपेठेतून हा मोर्चा प्रांत अधिकारी कार्यालयावर नेला जाणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख सुरेश महाडिक यांनी दिली. चवदार तळे येथे आंबेडकरी संघटनांच्या झालेल्या निषेध सभेत आ. गोगावले यांच्यावर टीका करण्यात आली होती.

Web Title: Today's rally on Shivsena's province's office