शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवी - जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:51 IST

चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 मधुकर ठाकूर

उरण : शेती हा जुगार आहे.परंतु आधुनिकीकरणामुळे त्याच्यात बदल करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवीच. त्यामुळे शेतीची कास धरा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी चिरनेर येथे केले.  

चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. कृषी अधीक्षक बाणखेले यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रक्रियेवरची प्रशिक्षणे घेऊन, प्रक्रिया युनिट उभी करून उत्पादक  कंपनी तयार करा. आणि त्याचा फायदा घ्या. उत्पादन प्रक्रियेची उद्योग कंपनीला मोठी गरज आहे. मात्र त्यासाठी प्रमुख घटक असलेल्या डायरेक्टर बोर्डाची जबाबदारीही  महत्त्वाची आहे. उरण तालुका शेतीच्या विकासाबाबत दुर्लक्षित राहिला आहे. आता तर इथे कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. दिवसेंदिवस गोदामांची संख्या वाढत आहे. यावर शेतकऱ्यांना मात करता येईल.

आपल्या जमिनीची विक्री न करता, कंपनी स्थापन करून कच्चा माल उपलब्ध नसेल तर बाहेरून  आणून प्रक्रिया करून,उत्पादन तयार करा. प्रक्रिया तयार करून केलेल्या मालाला नक्कीच जास्त भाव मिळेल. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर भात आणि नाचणी एवढेच आपण उत्पादन घेतो. भाताची विक्री केली तर आपल्याला किती भाव मिळतो. हे आपल्याला ठाऊक आहे .परंतु भातावर प्रक्रिया करून  पोहे तयार करून त्या पॅकेजची विक्री केली, तर नक्कीच जास्त पैसे मिळतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खेडचा फणस जुन्नर पर्यंत पोहोचतो. त्याच्या बियांची पावडर केल्यास ते मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर यावेळी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर यांनी जमिनी विकण्यापेक्षा जमीनीवर फड उभे करा. रासायनिक खतांमुळे नापीक झालेल्या जमिनी सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुपीक करा. कोकणात पारंपारिक शेती केली जाते. तिला बगल द्या. मधमाशा संपल्या, तर मानवी जीवन धोक्यात येईल. त्यासाठी निसर्ग वाचविण्याची गरज आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी चिरनेर सरपंच भास्कर मोकल, पोलीस पाटील संजय पाटील , प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर, तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर, सीए महादेव नवले, मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील,  नमिता वाकळे, कृषी पर्यवेक्षक अलका बुरकुळ, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक सुरज घरत, कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण ,कृषी सहाय्यक अदिका पानसरे, कृषी सहाय्यक सुषमा अंबुलगेकर, कृषी सहाय्यक आर. पी. भजनावळे, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.     कार्यक्रमासाठी महागणपती सेंद्रिय शेती गटाच्या शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.