मुंबई-गोवा महामार्गावर तीन गाड्यांना अपघात

By Admin | Updated: November 21, 2015 00:45 IST2015-11-21T00:45:53+5:302015-11-21T00:45:53+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर वहूर गावचे हद्दीत अचानक ट्रॅफिक जाम होऊन गोवा दिशेने जाणाऱ्या तीन गाड्या अचानक गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एकावर एक

Three trains on Mumbai-Goa highway have accidents | मुंबई-गोवा महामार्गावर तीन गाड्यांना अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर तीन गाड्यांना अपघात

दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर वहूर गावचे हद्दीत अचानक ट्रॅफिक जाम होऊन गोवा दिशेने जाणाऱ्या तीन गाड्या अचानक गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एकावर एक आपटून तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र या तीनही गाड्यांमधून प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वहूर गावचे हद्दीत राजकमल हॉटेलसमोर अचानक ट्रॅफिक जाम झाली. वेगात असणाऱ्या एमएच १५ एएस ३२८६, क्वालिस एमएच ४८ पी ५ इनेव्हा, एमएच ०५ सीएच ०४९० होंडा कार या एकमेकांवर जोराने आपटल्या. यामध्ये तीनही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तिन्ही गाड्यांमधील प्रवाशांना किरकोळ मार लागला.

वहूरमध्ये एकाचा मृत्यू
दासगांव : महाड तालुक्यासाठी वहूर गावचे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत चेन्नई इथल्या राहणाऱ्या एका इसमाचा शुक्रवारी दुपारी १ वा.च्या सुमारास अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. राजेंद्र लोगनाथ कुरकुम (६०, रा.चेन्नई) महाड तालुक्यात अनेक वर्षांपासून काम करीत आहे.

Web Title: Three trains on Mumbai-Goa highway have accidents