शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमध्ये त्रिस्तरीय सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:42 IST

या प्लांटच्या देखरेखीसाठी ३ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना पनवेल महापालिकेकडून ट्रेनिंग देण्यात आले असून, या प्लांटमध्ये दाब कमी-जास्त झाला व काही बिघाड झाला, तर तीन लेयर सिस्टिम या प्लांटमध्ये बसवण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : नाशिक महापालिका क्षेत्रात घडलेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेमुळे सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्टची तपासणी केली जात आहे. त्यानुसार पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमध्ये त्रिस्तरीय सुरक्षा लावण्यात आली आहे.

या प्लांटच्या देखरेखीसाठी ३ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना पनवेल महापालिकेकडून ट्रेनिंग देण्यात आले असून, या प्लांटमध्ये दाब कमी-जास्त झाला व काही बिघाड झाला, तर तीन लेयर सिस्टिम या प्लांटमध्ये बसवण्यात आली आहे. हा प्लांट बंद पडला, तर बॅकअपमध्ये ६ ड्युरा सिस्टीम असून, ड्युरा सिस्टीम बंद पडली, तर बॅकअपला जम्बो सिस्टीम म्हणून प्रत्येक मजल्यावर बसवली गेली आहे. हा प्लांट बंद पडला, तर दुसरा प्लांट कार्यान्वित केला जातो. जेणेकरून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडून गैरसोय होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली.उपजिल्हा रुग्णालयात सध्या १५७ रुग्ण उपचार घेत आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत.

बेड रिकामे नाहीचउपजिल्हा रुग्णालयात एकूण १२८ ऑक्सिजन बेड आहेत. सध्या सर्वच्या सर्व बेड भरले असून, एकही बेड रिकामा नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या