तीन हजार अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण, मतदान बिनचूक व पारदर्शक पार पडणार

By निखिल म्हात्रे | Published: March 22, 2024 05:30 PM2024-03-22T17:30:42+5:302024-03-22T17:32:07+5:30

२४ प्रशिक्षणे घेण्यात आली. यात तीन हजार विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

Three thousand officials and employees will be trained, voting will be conducted without errors and transparently | तीन हजार अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण, मतदान बिनचूक व पारदर्शक पार पडणार

तीन हजार अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण, मतदान बिनचूक व पारदर्शक पार पडणार

अलिबाग : निवडणूक विषयक सर्व प्रकिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी जिल्ह्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रकिया सुरु होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे. आदींबाबत तसेच मॉक पोल प्रकियेच्या सुरुवातीपासून ते प्रकिया संपन्न होईपर्यंतची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली.

आतापर्यंत २४ प्रशिक्षणे घेण्यात आली. यात तीन हजार विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी ज्योत्सना पडियार हे काम पाहात आहेत. उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, अजित नैराळे, राहुल मुंडके, मुकेश चव्हाण, जनार्दन कासार, तहसीलदार विकास गारुडकर, महेश शितोळे, स्वाती पाटील, चंद्रसेन पवार, जिल्हा परिषद लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा सूचना अधिकारी नीलेश लांडगे यांनी या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना विविध विषयांचे प्रशिक्षण दिले आहे.

निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेतील विविध घटकांना या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पाडण्यासाठी फायदा होईल.
-किशन जावळे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी

Web Title: Three thousand officials and employees will be trained, voting will be conducted without errors and transparently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.