कर्जतमध्ये वीज पडून तिघे जखमी
By Admin | Updated: November 24, 2015 01:58 IST2015-11-24T01:58:15+5:302015-11-24T01:58:15+5:30
तालुक्यात रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या अवेळी पावसाने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने अंगावर

कर्जतमध्ये वीज पडून तिघे जखमी
कर्जत : तालुक्यात रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या अवेळी पावसाने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने अंगावर वीज पडल्याने एकाच घरातील तिघे जखमी झाले आहेत, तर एका शेतकऱ्याचा बैल ठार झाला आहे.
खांडस भागातील तुंगी येथील एका घरावर सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वीज पडल्याने त्या घरातील बाळू आसवले, त्यांच्या दोन मुली योगिता आणि नीता आसवले असे तिघे जखमी झाले. याची माहिती मिळताच खांडस येथील तलाठी संजय विशे, तेथील कारकून दाजी ऐनकर आणि दिनेश राणे यांनी तुंगी गाव गाठले. त्या तीन जखमींना प्रथम कशेळे आणि नंतर कर्जत येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या तिघांची प्रकृती नाजूक असल्याने त्या सर्वांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. तर पेठ येथील शेतकरी शिवाजी पिंपरकर यांचा शेतामध्ये बैलाच्या अंगावर वीज पडल्याने तो ठार झाला.
कर्जत - नेरळमध्ये पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. माथेरानमध्ये रविवारी रात्रभर वीज गायब होती.(वार्ताहर)