माणगावमध्ये तीन घरे फोडली
By Admin | Updated: April 29, 2017 01:48 IST2017-04-29T01:48:20+5:302017-04-29T01:48:20+5:30
शहरातील कचेरी रोडवरील इशरत प्लाझा या इमारतीमधील तीन बंद घरे चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम

माणगावमध्ये तीन घरे फोडली
माणगाव : शहरातील कचेरी रोडवरील इशरत प्लाझा या इमारतीमधील तीन बंद घरे चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६८ हजार रु पयांचा ऐवज घेऊन पलायन केले. ही घटना २६ ते २७ एप्रिल सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या घटनेची फिर्याद माणकेश्वर अनंत नार्वेकर (५५) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. नार्वेकर यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून कपाटात ठेवलेले १३ हजारांचे दागिने व रोख ५५ हजार असा एकूण ६८ हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला. याच रूमच्या शेजारील बी विंगमधील फ्लॅट नं. १०८, ११०मध्येही चोरीचा प्रयत्न केला. घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात असून अधिक तपास माणगावचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार स्वप्निल कदम हे करीत आहेत.
सुटीच्या कालावधीत सुटीवर जाताना नागरिकांनी मौल्यवान वस्तू सोबत घेऊन जावे, तसेच जाताना नजीकच्या पोलीस ठाण्यात कळविणे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)