महाड : महाड शहरात महामार्गालगत पिजी सिटी या रहिवासी संकुलातील बंद असलेले तीन फ्लॅट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून पलायन के ले. ही चोेरीचीघटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे .पिजी सिटीमधील गोेविंद साई या इमारतीच्या बी विंगमधील गणेश देशमुख यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते, तर ते स्वत: रात्रपाळीला कामावर गेले असता त्यांचा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडून कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने चोरून नेले. याच विंगमधील संगीता पलंग ेयांच्याही फ्लॅटचे कुलूप तोडून तीन हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याच इमारतीतील संदीप सावंत यांचाही फ्लॅट चोरट्यांनी फोडला. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. घरफोड्यांच्या घटना वारंवार घडतच असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
महाड शहरात एकाच रात्री तीन घरफोड्या
By admin | Updated: June 14, 2016 01:07 IST