तीन उमेदवारांनी घेतले अर्ज मागे
By Admin | Updated: November 11, 2016 03:16 IST2016-11-11T03:16:15+5:302016-11-11T03:16:15+5:30
मुरुड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरु वात झाली असून प्रभाग ८ मधून १७ नगरसेवक पदासाठी ५८ तर ४ नगराध्यक्षापदासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.

तीन उमेदवारांनी घेतले अर्ज मागे
आगरदांडा : मुरुड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरु वात झाली असून प्रभाग ८ मधून १७ नगरसेवक पदासाठी ५८ तर ४ नगराध्यक्षापदासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
गुरुवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी अपूर्वा वानखेडे यांच्याकडे अपक्ष उमेदवार नितीन नामदेव आंबुर्ले प्रभाग क्र मांक ६ ब, सर्वसाधारणमधून तर भाजपाकडून मंगल ललित जैन प्रभाग क्र मांक ६ क, सर्वसाधारण महिला, अपक्ष उमेदवार पूजा प्रशांत कासेकर प्रभाग क्रमांक ६ क, सर्वसाधारण महिलांमधून यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, नगराध्यक्षासाठी कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला नाही.
शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार नामनिर्देशनपत्र मागे घेतो, याकडे मुरुडच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी दुपारी ३ नंतर कोण कोणता पक्ष कोणाच्या विरोधात ते स्पष्ट होईल. त्यानंतर प्रचारला जोरदार सुरुवात होईल. सध्या प्रत्येक पक्षाचे नेते व उमेदवार नागरिकांना आपल्याकडे वळवण्यास मग्न आहेत. प्रचारचा वेग कमी असला तरी अंतर्गत राजकारणावर अधिक भर दिला जात आहे. तसेच सोशल मीडियावरही प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)