विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:08 IST2019-05-12T00:08:33+5:302019-05-12T00:08:41+5:30
एका विवाहितेला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाºयास व त्याच्या दोन सहकाऱ्यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. उरण तालुक्यातील जसखार येथे राहणारी पीडित महिला २ मे रोजी मुलाला भेटण्यासाठी खालापूर तालुक्यातील मानकिवली येथे आली होती. या

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक
कर्जत : एका विवाहितेला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाºयास व त्याच्या दोन सहकाऱ्यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
उरण तालुक्यातील जसखार येथे राहणारी पीडित महिला २ मे रोजी मुलाला भेटण्यासाठी खालापूर तालुक्यातील मानकिवली येथे आली होती. यावेळी एका हॉटेलमध्ये बसली असता, सूरज नावाच्या व्यक्तीने तिचा मोबाइल घेतला. तिने आरडाओरड केल्याने त्याने मोबाइल परत केला. त्यानंतर ती पतीसह निघून गेली.
शुक्रवार १० मे रोजी पुन्हा मानकिवली येथे जाण्यासाठी महिला व तिचे पती कर्जत येथील भिसेगाव रिक्षा स्टँड येथे आले असता सूरजने तिला अडवले व फोन उचलत नसल्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. रात्री ती पतीसह ट्रेनने खोपोलीला जायला निघाली. यावेळी सूरज मित्रांसह धावत्या ट्रेनमध्ये चढला आणि त्याने पीडितेच्या पतीला मारहाण केली. पळसदरी स्थानक येताच विवाहितेला घेऊन ते तिघे उतरले. त्यानंतर वेताळ मंदिराच्या डोंगरावर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी विवाहितेच्या पतीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर अवघ्या दीड तासात पोलिसांनी आरोपी तिघांना ताब्यात घेतले आहे. सूरज अमरदीप चव्हाण, (रा. भिसेगाव), अजय प्रताप राठोड (रा.क्रांती नगर झोपडपट्टी), बबलू अशोक सिंग (रा. पुलाची वाडी - किरवली) यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.