शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरांकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 02:02 IST

चार आरोपींना अटक : पनवेलमध्ये गुन्हे शाखेची कारवाई

पनवेल : पनवेल परिसरातील मोबाइल चोरी करणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखा २ च्या वतीने अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरलेले १ लाख ४ हजार ५०० रुपयांचे १४ मोबाइल, १० हजार रुपयांचा लॅपटॉप व ३२ हजार रुपये असा एकूण १ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे नागरिक पुरते त्रस्त झाले होते. कारच्या काच फोडून मोबाइलची चोरी किंवा पादचाºयाच्या हातातील मोबाइल घेऊन चोर पसार होतात. कळंबोली येथे १४ मे रोजी दुकान फोडून चोरट्यांनी ८७ हजार रुपयांचे ११ मोबाइल चोरून नेले होते.मोबाइल चोरीचे गुन्हे कळंबोली, तळोजा, खांदेश्वर, सानपाडा या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. गुन्हे शाखा २ चे पोलीस शिपाई संजय पाटील, पोलीस हवालदार कानगुडे यांना मोबाइल चोरांबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले व त्यांच्या पथकाने सापळा लावून मोहम्मद असल्लम इब्राहिम खान (२४), मोहम्मद अश्रफ इब्राहिम खान (२०, दोन्ही रा. वावंजे), दिनेश गोपीनाथ गांगुर्डे (२०, रा. पडघे गाव), महमद तारीफ हुसेन अबुल हुसेन (रा. मुंबई) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तपासात चोरलेले १ लाख ४ हजार ५०० रुपयांचे १४ मोबाइल, १० हजार रुपयांचा लॅपटॉप व ३२ हजार रुपये असा एकूण १ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. याशिवाय कळंबोली, तळोजा, खांदेश्वर, सानपाडा येथील चोरी, घरफोडी, जबरी चोरी सारखे एकूण ७ गुन्हे शिताफीने उघडकीस आणले आहेत. 

टॅग्स :MobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस