शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

भविष्यात किल्ले रायगडावर पाणीटंचाई भासणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 03:12 IST

किल्ले रायगड संवर्धनाचे काम प्रगतिपथावर असून, किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे काम केले जात असल्याचे सांगितले.

दासगाव - किल्ले रायगड संवर्धनाचे काम प्रगतिपथावर असून, किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे काम केले जात असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी रायगड रोपवेच्या असहकार्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.किल्ले रायगड गेली अनेक वर्षे विकासापासून व संवर्धनापासून दुर्लक्षित राहिला. यामुळे गडावरील वास्तूंचे नुकसान झाले. शिवाय, शिवप्रेमींना हव्या असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव निर्माण झाला. याबाबत वारंवार आवाज उठल्यानंतर शासनाने रायगडसह राज्यातील विविध किल्ल्यांच्या संवर्धनाकरिता एक प्राधिकरण तयार केले. या रायगड प्राधिकरण विभागाकडून सध्या रायगडाच्या विविध घटकांचा अभ्यास करून संवर्धन आणि पर्यटक, शिवप्रेमींना गरजेच्या सोयी-सुविधांचे काम केले जाणार आहे. यामध्ये रायगडावरील ऐतिहासिक वास्तू, पायऱ्यांचा मार्ग, प्रकाश योजना, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. याकरिता ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ५६ कोटी रुपये प्राधिकरणाकडे जमा झाले आहेत. यामधून रायगडच्या विविध पाण्याचे स्रोत दुरुस्त करणे, ऐतिहासिक वास्तूंची कामे, पायरी मार्ग, महाड-रायगड मार्ग यांची कामे केली जात आहेत. तर हत्ती तलावाचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. या कामांची पाहणी खा. संभाजीराजे यांनी केली.रायगडावर जाण्यासाठी असलेल्या पायी मार्गाचे काम सुरू असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी आणि पर्यटकांकरिता नाना दरवाजाचा मार्ग सुरू करण्यात आला आहे. या मार्गात असलेल्या नाना दरवाजाचे काम कशा प्रकारे केले जाणार याची माहितीदेखील या वेळी खा. संभाजीराजे यांनी दिली. त्यांच्या समवेत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, रायगड प्राधिकरणाचे विश्वनाथ सातपुते, आरेखक वरुण भामरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वप्निल बर्वे आदी उपस्थित होते. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली हे काम केले जात असून, ऐतिहासिक वास्तूंना शोभेल असेच काम केले जाणार आहे. याकरिता लागणारा दगड हा याच ठिकाणाहून गोळा केला जात आहे. पुरातत्त्वच्या मार्गदर्शनाखाली चुना आणि विविध नैसर्गिक घटकांचा वापर करून येथील बांधकाम केले जात आहे.रायगडावरील कामे सुरू झाल्यावर ३५० ते ४०० लोकांना रोजगार मिळणार आहे. परिसरात २१ गावांच्या मूलभूत सुविधांकरिता देखील प्राधिकरण काम करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. या माध्यमातून ग्रामीण भागातून रस्त्यांकरिता पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.रायगडावर शिवकाळात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले होते, याकरिता ठिकठिकाणी बंधारे, तलाव बांधलेले आहेत. मात्र, काळाच्या ओघात बंधारे, तलाव बुजले होते, यामुळे गंगासागर रायगडावर येणाºया शिवप्रेमींची तहान भागवत होते.गडावरील २१ टाक्यांची साफसफाई, दुरुस्तीसध्या सुरू असलेल्या रायगड प्राधिकरणाच्या कामामध्ये जवळपास २१ पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या आहेत. हत्ती तलावाचे कामदेखील प्रगतिपथावर असून, गळती शोधून काढण्यात यश मिळाल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगून गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे स्पष्ट केले. रायगडावर केल्या जाणाºया विजेच्या व्यवस्थेकरिता देखील सहा कोटी रुपये अपेक्षित आहेत. रायगडावरील विजेची व्यवस्था ही अंडरग्राउंड केली जाणार आहे. गंगासागर तलावाजवळच्या मनोºयावर लाइट शोची निर्मिती केली जाणार आहे.रायगड संवर्धनाच्या कामात रायगड रोपवेची असहकार्याची भूमिकारायगड किल्ल्यावर जाण्याकरिता रायगड रोप वेची निर्मिती करण्यात आली, यामुळे रायगडावर जाणे-येणे सहज शक्य आहे. गडावर पर्यटकांची गर्दीदेखील वाढली.आज रायगडाच्या संवर्धनाचे काम सुरू असताना गडावरील कामांकरिता लागणारा दगड नेण्याकरिता तीन रुपये किलो दर लावण्यात आला.प्राधिकरणाने यापेक्षा कमी दराची मागणी केली होती. मात्र, याबाबत त्यांनी नकार दिल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगून, रायगडाच्या विकासात रायगड रोपवे प्रशासनाच्या असहकार्याच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.रोप वे प्रतिमाणसी दरदेखील वाढवला आहे. शासनाचे सहकार्य असतानाही दरवाढ अपेक्षित नाही. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांजवळही बोललो असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड