शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मोदींची लाट दिसत नाही- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:36 IST

प्रचारानिमित्त २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो होतो, तेव्हा मोदींची लाट दिसत होती.

नागोठणे : प्रचारानिमित्त २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो होतो, तेव्हा मोदींची लाट दिसत होती. त्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीनिमित्त आता फिरत असताना ही लाट जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या मित्रपक्षांची लाट उसळली असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील तरुणाई तेव्हा भाजपच्या प्रचाराला भुलली, तेव्हा हा प्रकार घडला होता. आज बहुतांशी तरुण मतदार आमच्या मागे उभा असल्याने महाआघाडीच सत्तेवर येणार, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागोठण्यात व्यक्त केला.महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराची जाहीर सभा गुरुवारी सायंकाळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गांधी चौकात पार पडली, त्या वेळी मुंडे बोलत होते. पंतप्रधान मोदी सपनोंके सौदागर असून त्यांनी दिलेल्या अच्छे दिनची आता चेष्टा व्हायला लागली आहे.

आज निवडणुका नसत्या तर, पेट्रोलच्या किमतीने आता सेंच्युरीच गाठली असती. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या राज्यात असणारी पेट्रोल व गॅसची किंमत व आताची किंमत याची तुलना करता पाच वर्षांत आपले किती वाढीव पैसे गेले याचे गणित केले, तर आपल्याला रात्रभर झोपच लागणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणून संबोधित असल्याने इमानदारीने चौकीदार म्हणून नोकरी करणारा चौकीदार, बदनाम व्हायला लागला आहे असा आरोप करताना मुंडे यांनी मोदींनी केलेल्या पापाचे वाटेकरी शिवसेना सुद्धा असल्याचे स्पष्ट केले.
या मंत्रिमंडळात असणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत विधिमंडळात कायम आवाज उठवला असून अनंत गीते यांनी रायगडच्या जनतेला आतापर्यंत काय दिले आहे, याचे उत्तर द्यावे अशी मागणी मुंडे यांनी या वेळी केली. सुनील तटकरे यांच्या नावाचे आणखी दोन उमेदवार उभे करावे लागतात, हीच विरोधकांची नाचक्की असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. या सभेला आ. धैर्यशील पाटील, आ. अनिकेत तटकरे, रोहे तालुका काँग्रेस अध्यक्ष मारुती देवरे, माजी जि. प. सदस्य नरेंद्र जैन, राष्ट्रवादीचे नेते शिवराम शिंदे, दिलीपभाई टके, तानाजी देशमुख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019