पनवेलमध्ये एनएमएमटीचे दोन नवीन मार्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:43 IST2017-08-08T06:43:40+5:302017-08-08T06:43:40+5:30
एनएमएमटी प्रशासनाने पनवेलमध्ये दोन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशन ते नेरे व दुसरा मार्ग स्टेशनपासून हायकल कंपनीपर्यंत असणार असून यामुळे एमआयडीसीसह मनपा क्षेत्रातील इतर नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.

पनवेलमध्ये एनएमएमटीचे दोन नवीन मार्ग सुरू
नवी मुंबई : एनएमएमटी प्रशासनाने पनवेलमध्ये दोन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशन ते नेरे व दुसरा मार्ग स्टेशनपासून हायकल कंपनीपर्यंत असणार असून यामुळे एमआयडीसीसह मनपा क्षेत्रातील इतर नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने तळोजा औद्योगिक वसाहत व नेरे परिसरामध्ये बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून नागरी वस्ती वाढत आहे.
नागरिकांच्या मागणीची दखल घेवून एनएमएमटी प्रशासनाने दोन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ७७ क्रमांकाचा मार्ग पनवेल रेल्वे स्टेशनपासून अभ्युदय बँक, श्रेयस हॉस्पिटल, नवीन बस स्थानक, सुकापूर सर्कल, सुकापूर गाव, शासकीय वसतिगृह भालेवाडी, वावजे फाटा, चिपळे फाटा, कोप्रोली गाव, रॉयल मिडोझ, महालक्ष्मी नगर गेट, परिजात सोसायटी, महालक्ष्मी नगर नेरे असा असणार आहे.
एनएमएमटीचा ७८ क्रमांकाचा बस मार्ग रेल्वे स्टेशन ते पनवेल बस स्थानक, नवीन पनवेल ब्रीज, ठाणा नाका, खांदा गाव, आसुडगाव आगार, कळंबोली सर्कल, बिमा कॉम्प्लेक्स, प्रादेशिक परिवहन कार्यालय कळंबोली, खिडुकपाडा, नावडे गाव, नावड फाटा, पेंधर फाटा, देना बँक, हिन्डाल्को कंपनी, युनायटेड व्हॅन डेअर हॉरस्ट, दीपक फर्टिलायझर्स, तोंडरे फाटा, आयजीपीएल हायवे, एक्साईड बॅटरी कंपनी ते हायकल कंपनीपर्यंत हा मार्ग असणार आहे.
दोन नवीन बस मार्ग सुरू केल्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये रोज ये - जा करणाºया कामगारांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. याशिवाय नेरे परिसरामध्ये झपाट्याने बांधकाम होत असून तेथेही रोज हजारो बांधकाम मजूर ये - जा करत असतात. याशिवाय शहरीकरणामुळे तेथे वास्तव्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही रेल्वे स्टेशनकडे येण्यास मदत होणार आहे.
बस क्रमांक ७७
प्रवर्तन आगार - आसुडगाव
गाड्यांची संख्या - ४
प्रवास अंतर - २५ मिनिटे
बस मार्गाची लांबी - ७.८ किलोमीटर
मार्ग - रेल्वे स्टेशन ते नेरे
बस क्रमांक ७८
प्रवर्तन आगार - आसुडगाव
गाड्यांची संख्या- ६
प्रवास अंतर - ६० मिनिटे
मार्गाची लांबी - १६.९
मार्ग - रेल्वे स्टेशन ते एमआयडीसी हायकल कंपनी