जिल्ह्यात ८४० जागांसाठी २,४५५ उमेदवार आहेत रिंगणात; ४ जानेवारीनंतर चित्र स्पष्ट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:11 IST2021-01-02T00:11:17+5:302021-01-02T00:11:31+5:30
ग्रामपंचायत निवडणुका: ४ जानेवारीनंतर चित्र स्पष्ट होणार

जिल्ह्यात ८४० जागांसाठी २,४५५ उमेदवार आहेत रिंगणात; ४ जानेवारीनंतर चित्र स्पष्ट होणार
रायगड : रायगड जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अलिबाग तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या ३८ सदस्यपदांसाठी १४० अर्ज दाखल झाले. त्यापैकी २ अर्ज अवैध ठरल्यानंतर १३८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
पेण तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमधील ६७ जागांसाठी १८१पैकी २ अर्ज अवैध ठरल्यानंतर १७९ अर्ज अवैध ठरले. कर्जत तालुक्यात ९ ग्रामपंचायतींमधील ८९ सदस्य पदांसाठी २९७ अर्ज छाननीअंती पाच अवैध ठरल्याने २९२ अर्ज वैध झाले. रोहा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील ६०७ दाखल अर्जांपैकी ९ अर्ज अवैध ठरल्यानंतर ५९८अर्ज वैध ठरले आहेत. माणगाव तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील ४७ सदस्य पदांसाठी ७९ दाखल अर्जांपैकी तर, महाड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील ४७ सदस्य पदांसाठी ९३ दाखल अर्जांपैकी सर्व अर्ज वैध ठरले.
श्रीवर्धन तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमधील ३६ सदस्य पदांसाठी दाखल ९७ अर्जांपैकी १ अर्ज अवैध ठरल्यानंतर ९६ अर्ज वैध ठरले, तर म्हसळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमधील २७ सदस्य पदांसाठी ४३ पैकी १ अर्ज अवैध ठरल्यानंतर ४२ अर्ज वैध ठरले आहेत. पनवेल तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमधील २२८ सदस्य पदांसाठी ६९१ व उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमधील ७० सदस्य पदांसाठी २४७ दाखल झाले आहेत.