शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:05 IST

पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे.

- कांता हाबळे नेरळ : पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून दिवे बंद आहेत, त्यामुळे परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय, काही समाजकंटक रात्रीच्या वेळी घरांवर दगडफेक करीत असल्याचेही समोर येत आहे.पोशीर ग्रामपंचायतीने ७३ हजार २२० इतक्या रकमेचे १३५ दिवे खरेदी केले होते. तसेच ते पोलवर बसवण्याकरिता प्रतिदिवा प्रतिपोल १०० रु पये मजुरी याप्रमाणे १३,००० इतका खर्च करून पोशीरमध्ये सर्व प्रभागांत पथदिवे बसविले होते. या पथदिव्यांना दोन वर्षांची वॉरंटीही देण्यात आलेली होती; परंतु हे पथदिवे बसविल्यानंतर महिन्याभरातच बंद पडले. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत बंद दिव्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावर सदर बंद दिवे रिप्लेस करून विद्युत पथदिवे पूर्ववत करण्यात येतील, असा शब्द सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी ग्रामसभेला दिला होता. त्यानंतर नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी पोशीरमधील पथदिव्यांची स्थिती जैसे थे च आहे. रस्त्यावरील दिवे बंद असल्याने रात्री पोशीरमधील रस्त्यांवर अंधारच अंधार असतो. देवपाड्यातही तीच परिस्थितीआहे.पोशीर गावात काही ठिकाणी गेले काही दिवस आकस्मिक दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरलेला असताना गावातील रस्त्यांवर अंधार असल्याने हीच स्थिती गणेशोत्सवात राहिली तर गावकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार हे निश्चित. पोशीरमधील ग्रामस्थांनी पथदिवे बदलण्याची मागणी केली आहे. मात्र, दहा दिवस झाले तरी अद्याप पथदिवे पूर्ववत करून न बसविल्याने हे दिवे बसविण्यासाठी ग्रामपंचायत अद्याप मुहूर्त शोधत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.पोशीर ग्रामपंचायतीतील मनमानी कारभार अनेकदा चव्हाट्यावर आलेला असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे देखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यातच पोशीरमधील या बत्तीगुल प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले आहे.>पोशीरमधील पथदिव्यांमध्ये पाणी जात असल्याने पथदिवे बंद पडले आहेत, ते बदली करण्यासाठी दिले आहेत. दोन दिवसांत दिवे मिळाल्यानंतर पोलवर बसवण्यात येतील.- हरिश्चंद्र निरगुडा, सरपंच, ग्रा. प. पोशीर>दिवाबत्ती ही मूलभूत सुविधादेखील धड पुरवली जात नाही, त्याकरिता वारंवार आठवण करून द्यावी लागते हे दुर्दैव आहे. दिवे रिप्लेस करण्यासाठी एक वर्ष लागते ही हास्यास्पद बाब आहे.- प्रवीण शिंगटे, ग्रामस्थ, पोशीरपोशीर ग्रामपंचायतीचा कारभार संवेदनाशून्य आहे, त्यामुळेच पोशीरमध्ये अशा घटना घडत आहेत. या कालावधीत काही अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्यास ग्रामपंचायत जबाबदार असेल.- मनेष राणे, माजी सदस्य, पोशीर