शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

...तर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 08:14 IST

वादळग्रस्तांना दिली तीनपट अधिक रक्कम 

रायगड : पाच वर्षांत चार वादळं आली. पण राज्य सरकार तुमच्या सोबत आहे. केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीन पट पैसे देण्याचं काम राज्याने केले. कोरोना कसा हल्ला करेल, सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचचे आपले काम आहे. विकासाची सुरुवात झाली, पण कामाला सुरुवात करताच कोरोनाने प्रवेश केला. त्यामुळे १४ महिने झाले राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा कमी झाला. विकासकामे चांगली झाली पाहिजेत.नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. असा इशारा मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. श्रीवर्धनमधील बीच सुशोभीकरण व २३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले कि, सध्या प्री-वेडिंगचा ट्रेंड आहे. लग्नाआधीच्या आठवणींसाठी विवाह बंधनात अडकणारे जाेडपे असे चित्रीकरण करतात. प्री-वेडिंगचा व्यवसाय आहे. त्यामुळे गडकिल्ले यावर प्री-वेडिंगचे शूटिंग करताना त्यांना अडवू नका. प्री-वेडिंगच्या माध्यमातून पर्यटन विकास कसा साधता येईल, याचा विचार करा. त्याबाबत आवश्यक ती नियमावली जिल्हाधिकारी आणि पाेलीस अधीक्षकांनी एकत्रित तयार करावी, तसेच त्यासाठी काही शुल्कही आकारावे, असा सल्ला पवार यांनी दिला. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील तब्बल २३ काेटी रुपयांच्या पाणीपुरवठा याेजनेच्या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते. पवार यांच्या या सल्ल्यामुळे नजीकच्या कालावधीत समुद्रकिनारी, पर्यटन स्थळी प्री-वेडिंग करणाऱ्या जोडप्यांना आणि शूटिंग करणाऱ्यांना आता कोणतीही अडचण येणार नसल्याचे दिसून येते. अनेक वेळा प्री-वेडिंग शूटिंगसाठी नियमावली नसल्याने भांडणाचे प्रसंग निर्माण होत असतात. त्यामुळे पोलिसांपर्यंत हा विषय जातो मात्र, त्यांना परवानगी दिल्यास हे वाद टाळले जातील, असेही पवार यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार