वनजमिनीतील मातीची चोरी
By Admin | Updated: May 15, 2016 01:07 IST2016-05-15T01:07:43+5:302016-05-15T01:07:43+5:30
दहिसर-मनोर वनपालक्षेत्र परिसरात येणाऱ्या हतोली-बोट नदीकाठी असलेली वन जमिनीतील लाखो ब्रास माती उतखन्नन झाल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच एक ब्रास माती भरलेला

वनजमिनीतील मातीची चोरी
मनोर : दहिसर-मनोर वनपालक्षेत्र परिसरात येणाऱ्या हतोली-बोट नदीकाठी असलेली वन जमिनीतील लाखो ब्रास माती उतखन्नन झाल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच एक ब्रास माती भरलेला ट्रॅक्टर दिखाव्यासाठी वनविभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पकडून दोन आदिवासी मजुरांवर कारवाई केली बाकी लाखो ब्रास माती कुठे गेली? त्याची चौकशी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची करावी अशी मागणी हतोली बोट गावातील नागरिक करीत आहेत.
दहिसरतर्फे मनोर वनपाल क्षेत्र अंतर्गत येणारे हतोली बोट येथील वनविभागचे जमिनीतील माती उतखन्नन केली जात होती. आतापर्यंत लाखो ब्रास माती वीटभट्टी व भरावासाठी राजसोसपणे वन अधिकारी व कर्मचारी यांच्या नाकावर टिच्चून लंपास केली हा प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. तरी सुद्धा कारवाई शून्य होती. मात्र लोकमत वृत्तपत्राने दखल घेऊन बातमी प्रसिद्ध करताच उपवनसहायक वनरक्षक कुंपते पालघर वनक्षेत्रपाल प्रियंका शिंदे व इतर अधिकारी खडबडून जागे झाले त्यांनी हातोली येथे वनजमिनीतून माती भरत असलेल्या ट्रॅक्टरला पकडले त्यावरील बिगारी काम करणाऱ्या दोन मजूरांवर कारवाई केली ट्रॅक्टर जप्त केला आहे. गेल्या दोन महिन्या अगोदर वनजमिनीच्या जागेत सक्शनपंप लावून रेती काढली जात होती. त्या वेळी मोजके पंप पकडण्यात आले होते. कारण रात्री येथून सक्शन पंप गायब करण्यात आले. आमच्या जवळ साधने नसल्यामुळे आम्हाला ते पंप जप्त करता आले नाही गावकऱ्यांनी ते पळविले असे उत्तर त्या वेळी उपसहायक वनरक्षक कुपते यांनी दिले होते सक्शन पंप पकडले होते त्या वेळी वनविभागाचे हतोली येथील गेस्ट हाऊसला प्रियंका शिंदे व कर्मचारी व गावकरी यांची मोठी मिटिंग झाली होती व त्या मिटिंगमध्ये मांडवली झाली अशी चर्चा होती त्यामुळेच शून्य कारवाई झाल्याचे स्पष्ट झाले. (वार्ताहर)